Gold And Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी वाढणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

---Advertisement---

 

Gold And Silver Rate : जळगाव : या आठवड्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये तेजी कायम राहण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सोन्यातील तेजी अमेरिकेतील मोठे आर्थिक संकेत, जागतिक साठ्यात वाढ आणि भारतातील सणासुदीच्या मागणीमुळे आली आहे. सध्या २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १ लाख १५ हजार ४८० रुपयांवर पोहोचली आहे. तर चांदीची किंमत प्रति किलो १ लाख ४९ हजार रुपयांवर पोहोचली आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ११६,५५० रुपयांवर आहे, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत रु.१०६,८५० आहे. आर्थिक राजधानी पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता मध्ये २४ कॅरेट सोने रु.११६,४०० ला उपलब्ध आहे, तर २२ कॅरेट सोने रु.१०६,७०० ला प्रति १० ग्रॅम रु.१५,५०० ला आहे.

एकीकडे सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना सोशल मीडियावर सोन्यात मोठ्या प्रमाणात घसरण होणार असल्याचे संदेश येत आहे. काही संदेश भाववाढीचेही फिरत असल्याने सोने भावाबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सोन्याचा इतिहास पाहता १९२० मधील जागतिक मंदीचा अपवाद वगळता त्यानंतर १०५ वर्षात सोन्यामध्ये मोठी घसरण झाली नसल्याचे जाणकारांनी सांगितले.

अमेरिकन फेडरल बँकेचे धोरण तसेच विविध देशांकडून वाढलेली सोन्याची खरेदी यामुळे सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे भाव यापुढेही असेच वाढत राहणार असल्याचे सांगितले जात असताना सोशल मीडियावर वेगवेगळे संदेश फिरत आहेत.

सोशल मीडियावर सोने भावात घसरण होणारे तसेच भाववाढीचेही संदेश फिरत आहेत. ‘सोने भाव वाढत असल्याने ते आणखी वाढतील म्हणून त्यात गुंतवणूक करायची घाई करू नका, सोने ८५ हजारांपर्यंत खाली येईल’, असे संदेश व्हायरल होत आहे.

या सोबतच कधी ‘सोने एक लाख ५० हजारांपर्यंत पोहचणार’ असेही संदेश फिरत आहेत. त्यामुळे सोने भावाबाबत अनुकूल, प्रतिकूल संदेश फिरत असल्याने सोने नेमके ८५ हजारांवर येणार की दीड लाखांपर्यंत जाणार, असा प्रश्न निर्माण होऊन ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था वाढत आहे.

दरम्यान, मागणी कमी झाली अथवा बाजारात पुरवठा वाढला तरच सोन्याचे भाव कमी होऊ शकतात. मात्र या दोन्हीही शक्यता कमी आहे. सोन्याच्या भावात घसरण होईल, मात्र ती नेहमीप्रमाणे किरकोळ असू शकते. एकूणच सोने भाववाढीचा आलेख चढताच राहू शकतो. जागतिक मंदीचा अपवाद वगळता, नंतर सोने भावात मोठी घसरण झाल्याचा इतिहास नाही, अशी माहिती अभ्यासकांनी दिली आहे.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---