Gold rate : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे दागिने खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीसा दिलासा मानला जात आहे. चला जाणून घेऊया कोणत्या शहरात काय आहेत सोन्याचे दर.
जळगाव : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी म्हणजेच आज ३० एप्रिल रोजी २४ कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम ९७,६९३ रुपये, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ८९,५६३ रुपये आहे. जळगावच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ९६,६०० रुपये प्रति तोळा, तर चांदी ९८ हजार रुपये किलोवर आहे.
नंदुरबार : अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला नंदुरबारात सोन्याचे भाव तोळ्याला ९५ हजार ८०० रुपयांवर पोहचले. तर चांदीचा भाव किलोला ९७ हजार ५०० रुपये होता. भाव वाढला असला तरी बुधवारी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर खरेदीसाठी उत्साह राहील, अशी शक्यता येथील सराफा व्यावसायिक जगदीश सोनी यांनी व्यक्त केली.
धुळे : अक्षय तृतीयेच्या पुर्वसध्येला मंगळवारी धुळ्यात सायंकाळपर्यंत सोन्याचे दर ९६ हजार ८०० रूपये होते. बुधवारी अक्षय तृतीयेला सोने खरेदी शुभ मानली जात असल्याने सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी सरासरी दोनशे रूपये वाढ होऊन सोने ९७ हजार रुपये तोळ्यापर्यंत राहिल, असा अंदाज सोने व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर ९७,६९३ रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ८९,५६३ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ९७,५४७ रुपये आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत ८९,४१७ रुपये आहे.
बेंगळुरू : बेंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९७,५३५ रुपये , तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ८९,४०५ रुपये आहे. जर आपण चेन्नईबद्दल बोललो तर, येथे २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९७,५४१ रुपये, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८९,४११ रुपये आहे. दरम्यान, २२ एप्रिल रोजी सोन्याच्या किमतीने १ लाख रुपयांचा विक्रमी उच्चांक ओलांडला होता. परंतु, तेव्हापासून त्या किमतीत घसरण होत आहेत.
एका वर्षात सोन्याच्या किमतीत ३० टक्क्यांनी वाढ
व्हेंचर सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने ७३,२४० रुपये प्रति दहा ग्रॅम दराने होते, जे सध्या ९५,००० ते ९६,००० रुपयांवर आहे. म्हणजेच एका वर्षात ३० टक्के वाढ झाली आहे.
जर आपण अमेरिकेबद्दल बोललो तर, मंगळवारी झालेल्या घसरणीनंतरही येथील सोन्याचा भाव आजही तसाच आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑटो टॅरिफ कमी करण्याचे आणि अनेक देशांशी व्यापार चर्चा सुरू ठेवण्याचे संकेत दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गेल्या सत्रात ०.८ टक्क्यांनी घसरल्यानंतर सोन्याचा भाव प्रति औंस ३३१६ डॉलरवर पोहोचला आहे.
हे लक्षात घ्या
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर लादलेल्या शुल्कामुळे, आंतरराष्ट्रीय बाजारात बरीच अनिश्चितता होती. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची निवड केली. यामुळे, गेल्या आठवड्यात त्याची किंमत प्रति औंस $३५०० वर पोहोचली. अहवालानुसार, सिंगापूरमध्ये सोन्याची किंमत ०.१ टक्क्यांनी घसरून ३३१५.८७ डॉलर प्रति औंस झाली आहे.