मुंबई । येत्या काही दिवसांत भारतात सणासुदीला सुरुवात होणार असून करवा चौथ, धनत्रयोदशी आणि दिवाळीला लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतात. यानंतर लग्नाच्या मोसमाला सुरुवात होईल. मात्र त्यापूर्वी सोन्याच्या किमतीने नवीन भरारी घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याने 600 रुपयांहून अधिकची उसळी घेतल्याने आता ग्राहकांना ऐन सणासुदीत सोनं खरेदी करावं की नाही, हा प्रश्न पडतोय.
मागील आठवड्यात सोने 1500 रुपयांनी वधारले होते. 30 सप्टेंबर रोजी सोने 160 रुपयांनी तर 1 ऑगस्ट रोजी 330 रुपयांनी सोने घसरले होते. 2 ऑक्टोबर रोजी सोनं पुन्हा 540 रुपयांनी महागले. काल 3 ऑक्टोबर रोजी सोने 110 रुपयांनी वधारले.
आज 4 ऑक्टोबररोजी देखील सोन्यात दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याचे दर जवळपास 80 हजारांवर पोहोचले आहेत. या महिन्यात देखील सोन्याने दरवाढीचा हा नवीन विक्रम केलाय. तर, चांदीचे दर सध्या स्थिर आहेत. 29 सप्टेंबरपासून चांदीची विश्रांती सुरु आहे. किंमतीत कोणताच बदल झालेला नाही. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 95,000 रुपये आहे.