तरुण भारत लाईव्ह ।१६ फेब्रुवारी २०२३। तुम्हाला सोन किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बजेटनंतर सोन्याचा भाव 58000 रुपायांवर गेला होता. मात्र गेल्या काही जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या किमतीत जवळपास 2000 रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय.
काल सत्रात झालेल्या घसरणीनंतर आज गुरुवारी सोन्याच्या किमतीत किंचित घसरण दिसून आलीय. मात्र आज चांदीच्या किमतीत वाढ झालेली आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 11 वाजेपर्यंत 10 ग्रॅम सोन्याच्या किंमत 40 रुपयांनी घसरले आहे. यामुळे प्रति तोळा सोन्याचा दर 56,085 रुपयावर व्यवहार करत आहे. दुसरीकडे आज चांदीच्या किमतीत 194 रुपयाची वाढ झाली आहे. यामुळे प्रति किलो चांदीचा दर 65,615 व्यवहार करत आहे. दरम्यान, जळगाव सवर्णनगरीत गेल्या काही दिवसात सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण झालेली आहे. 2 फेब्रुवारी 2023 ला सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव तब्बल 58800 रुपायांवर गेला होता. मात्र आता सोने सर्वकालीन उच्चांकावरून 2000 हजार रुपयांनी घसरले आहे. आज गुरुवारी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,800 रुपये इतका आहे. तर चांदी दर 67000 रुपये प्रति किलो इतका आहे.
सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर (BIS Care) अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. हे अॅप आपल्याला प्रत्येक प्रकारे मदत करते.