---Advertisement---

धनत्रयोदशीला मुकेश अंबानींची अप्रतिम भेट, फक्त 10 रुपयांत मिळणार सोने

---Advertisement---

तुम्हीही धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. धनत्रयोदशीच्यानिमित्ताने मुकेश अंबानींची कंपनी जबरदस्त ऑफर्स देत आहे. तुम्ही फक्त 10 रुपयांत सोने खरेदी करू शकणार आहात. विशेषतः यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, अर्थात तुम्ही घरी बसून सोने खरेदी करू शकणार आहात.

स्मार्टगोल्डसह धनत्रयोदशी करा साजरी
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर, मुकेश अंबानींच्या कंपनी जिओ फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेडने त्यांची नवीन योजना ‘स्मार्टगोल्ड’ लाँच केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही डिजिटल पद्धतीने सोने खरेदी करू शकता. जेणेकरून तुमचे सोनेही सुरक्षित राहील.

स्मार्टगोल्ड योजनेंतर्गत, ग्राहक त्यांची सोन्यामधील गुंतवणूक कधीही रोख, सोन्याची नाणी किंवा दागिन्यांमध्ये रूपांतरित करू शकतात. या योजनेची खास बाब म्हणजे यासाठी तुम्हाला हजारो किंवा लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही, तुम्ही फक्त 10 रुपयांत सोने खरेदी करू शकता.

अशी करू शकता गुंतवणूक
मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्स ॲपद्वारे तुम्ही स्मार्टगोल्ड योजनेत दोन प्रकारे गुंतवणूक करू शकता. ग्राहक एकूण गुंतवणुकीची रक्कम ठरवू शकतात किंवा सोन्याच्या वजनानुसार सोने खरेदी करू शकतात.

भौतिक सोन्याची डिलिव्हरी फक्त 0.5 ग्रॅम किंवा त्याहून अधिक होल्डिंग्सपुरती मर्यादित असेल आणि 0.5 ग्रॅम, 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 5 ग्रॅम आणि 10 ग्रॅमच्या मूल्यांमध्ये उपलब्ध असेल. तुम्ही थेट सोन्याची नाणी खरेदी करण्याची सुविधा देखील घेऊ शकता, यासाठी तुम्हाला होम डिलिव्हरी देखील मिळेल.

चोरीची भीती नाही
स्मार्टगोल्ड योजनेअंतर्गत ग्राहक 24 कॅरेट सोने देखील खरेदी करू शकतात. ते सुरक्षित विमा केलेल्या तिजोरीत ठेवले जाईल. यामुळे सोने तर सुरक्षित राहीलच पण चोरीची भीतीही राहणार नाही. ॲपच्या मदतीने, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही सोन्याची थेट किंमत पाहू शकता.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment