Gold Rate : स्वस्त झालेले सोने पुन्हा महागले, जाणून घ्या आजचे दर

---Advertisement---

 

Gold Rate : गुरुवारी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. आज देशात २४ कॅरेट सोने प्रति १०० ग्रॅम १,००,७५० रुपये दराने झाले आहे. म्हणजेच त्याची किंमत प्रति १०० ग्रॅम ६०० रुपयांनी वाढली आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ५०० रुपयांनी वाढून ९,२३० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. त्याचप्रमाणे १८ कॅरेट सोने ४१० रुपयांनी महाग झाले असून, ७५,५२० रुपये प्रति १०० ग्रॅम दराने झाले आहे.

जळगावमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ३०० रुपयांनी घसरण ९९,००० (जीएसटी १०१९७०) रुपये प्रति १० वर पोहोचला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर २७५ रुपयांनी घसरून ९०७५३ (जीएसटी ९३४७५) रुपयावर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदी दरात तब्बल २००० रुपयांची घसरण होऊन, एक किलोचा दर विनाजीएसटी ११३००० रुपयावर पोहोचला आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्ली, जयपूर, लखनऊ आणि चंदीगडमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १०० ग्रॅम १,००,९०० रुपये आहे. तर वडोदरा, अहमदाबाद, पटना आणि सुरतमध्ये २४ कॅरेट सोने प्रति १०० १,००,८०० रुपये आहे.

दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोने प्रति १०० ग्रॅम ९२,४५० रुपये आहे. तर चेन्नई, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद आणि केरळमध्ये त्याची किंमत ९२,३०० रुपये आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद आणि केरळमध्ये १८ कॅरेट सोने प्रति १०० ग्रॅम ७५,५२० रुपये आहे. तर चेन्नईमध्ये त्याची किंमत ७६,३०० रुपये आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---