---Advertisement---
Gold-Silver Rate Today : जळगाव सुवर्णपेठेत सोने-चांदीच्या दरात वाढ सुरूच असून, सोन्याच्या भावात एक हजार २०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख चार हजार रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीच्या भावात दोन हजार ७०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख २१ हजार ५०० रुपयांवर पोहोचली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून सतत सोने-चांदीच्या भावात वाढ होत आहे. शुक्रवारी सोने एक लाख दोन हजार ८०० रुपये व चांदी एक लाख १८ हजार ८०० रुपये अशा उच्चांकी भावावर पोहोचले होते. शनिवारी सोन्याच्या भावात एक हजार २०० रुपयांची, तर चांदीच्या भावात दोन हजार ७०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख २१ हजार ५०० रुपयांवर पोहोचली आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोने विक्रमी पातळीवर…
राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत २,१०० रुपयांची वाढ होऊन, ते १,०३,६७० रुपये प्रति १० ग्रॅम या नवीन विक्रमी पातळीवर पोहोचले आहे.
एका दिवसापूर्वी २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,०१,५७० रुपये होती. सोन्याच्या किमतीत एवढी वाढ होण्याचे कारण स्टॉकिस्ट्सकडून सतत होत असलेली खरेदी आणि डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होणे हे असल्याचे मानले जात आहे.