Jalgaon Gold Rate : सोन्या-चांदीचे भाव गगनाला, जाणून घ्या दर

---Advertisement---

 

Jalgaon Gold Rate : जळगाव सुवर्णपेठेत सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून, सोन्याच्या भावात एक हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २२ हजार ३०० रुपयांवर पोहोचले आहे. तसेच चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ५२ हजार ८०० रुपयांवर पोहोचली आहे.

३ ऑक्टोबर रोजीचा अपवाद वगळता सोने-चांदीच्या भावात सतत भाववाढ सुरू आहे. त्यामुळे ७ ऑक्टोबरपर्यंत सोने एक लाख २१ हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर त्यात पुन्हा एक हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २२ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे, तर ७ ऑक्टोबर रोजी एक लाख ५१ हजार ३०० रुपयांवर पोहोचलेल्या चांदीच्या भावात पुन्हा एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ५२ हजार ८०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

त्यामुळे एक तोळे सोन्यासाठी आता जीएसटीसह एक लाख २५ हजार ९६९ रुपये मोजावे लागणार आहे. अर्थात, एक तोळे सोने आता सव्वा लाखाच्या पुढे गेले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढल्याने सोने-चांदीच्या भावात वाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिक यांनी सांगितले.

दिल्लीत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२४,०९०
२२ कॅरेट – ₹१,१३,७६०
१८ कॅरेट – ₹९३,११०

मुंबईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२३,९४०
२२ कॅरेट – ₹१,१३,६१०
१८ कॅरेट – ₹९२,९६०

चेन्नईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२४,२१०
२२ कॅरेट – ₹१,१३,८६०
१८ कॅरेट – ₹९४,२६०

कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२३,९४०
२२ कॅरेट – ₹१,१३,६१०
१८ कॅरेट – ₹९२,९६०

अहमदाबादमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२३,९९०
२२ कॅरेट – ₹१,१३,६६०
१८ कॅरेट – ₹९३,०१०

बंगळुरूमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२३,९४०
२२ कॅरेट – ₹१,१३,६१०
१८ कॅरेट – ₹९२,९६०

लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२४,०९०
२२ कॅरेट – ₹१,१३,७६०
१८ कॅरेट – ₹९३,११०

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---