मुंबई । सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार सुरु आहे. गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी ६२ हजारांवर गेलेला सोन्याचा दर ५८ हजारांच्या घरात आले होते. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडीचा पुन्हा सोन्याच्या किमतीवर दबाव दिसून येत आहे. सोन्याच्या किमतीने पुन्हा ६० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. सोबतच चांदीच्या किमतीने देखील मोठी उसळी घेतली आहे.
आंतरारष्ट्रीय बाजारात गुंतवणूकीचे पर्याय वाढल्यामुळे सोन्या-चांदीचे दरात वाढ होताना दिसून येत आहे. अमेरिकेतील महागाई कमी करण्यासाठी व्याजदर वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने-चांदी स्वस्त होऊ शकते असे वाटत असताना पुन्हा सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. जाणून घेऊया आजचा सोन्या-चांदीचा दर
आजचा सोन्याचा भाव
गुड रिटन्सच्या वेबसाईट्नुसार काल २६ जुलैला 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी 55,300 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,320 रुपये मोजावे लागणार आहे. तर आज 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी 55,600 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,400 रुपये मोजावे लागत आहे.
चांदीचा भाव
गुड रिटन्सच्या वेबसाईट्सनुसार आज २७ जुलैला चांदीच्या १० ग्रॅम भावासाठी 784 रुपये तर 1 किलो चांदीसाठी 78,400 रुपये मोजावे लागणार आहे.