---Advertisement---
जळगाव : जळगाव सुवर्णपेठेत सोन्याच्या भावात ९०० रुपयांची घसरण होऊन ते ९६ हजार ६०० रुपयांवर आले आहे. चांदीच्या भावातही ५०० रुपयांची घसरण होऊन ती १ लाख ८ हजार रुपयांवर आली असून, यामुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मध्यंतरी ९६ हजार रुपयांच्या खाली गेलेल्या सोन्याच्या भावात १ जुलै रोजी १ हजार १०० रुपयांची वाढ होऊन ते ९७हजार ३०० रुपयांवर पोहोचले होते.
त्यानंतर सराफ बाजारात किरकोळ चढ-उतार होत राहून ८ जुलैपर्यंत सोने ९७हजार ५०० रुपयांवर पोहोचले. आता त्यात ९०० रुपयांची घसरण झाली, असून ते ९६ हजार ६०० रुपये प्रतितोळ्यावर आले आहे.
दरम्यान, शुक्रवारीपासून श्रावण सुरु होत आहे. यामुळे सराफा बाजारत सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.