---Advertisement---

Gold Price Today : दिलासादायक ! सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण, जाणून ताजे दर

---Advertisement---

Gold Price Today : सोने खरेदीच्या विचारात असलेल्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. कारण सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. दुसरीकडे चांदी दरात मात्र मोठी वाढ झाली आहे.

जळगाव सुवर्णपेठेत चांदीच्या दरात १ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ९९,९१० रुपये किलो असलेल्या चांदीचे दर २१ मे पासून १ लाखांवर आहे. तर सोने दरात ८०० रुपयांनी घसरण झाली असून, प्रति तोळा सोने आता ९८,८८० रुपयांवर स्थिरावले आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोने ८९,०९० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे, तर २४ कॅरेट सोने ९७,१८० रुपयांवर व्यवहार करत आहे. जयपूरमध्ये २२ कॅरेट सोने ८९,०९० रुपये आणि २४ कॅरेट सोने ९७,१८० रुपये आहे. अहमदाबादबद्दल बोलायचे झाले तर, येथे २२ कॅरेट सोने ८८,९९० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे, तर २४ कॅरेट सोने ९७,०८० रुपयांवर विकले जात आहे.

पटनामध्ये २२ कॅरेट सोने ८८,९९० रुपये प्रति दहा ग्रॅम दराने विकले जात आहे, तर २४ कॅरेट सोने ९७,०८० रुपयांवर विकले जात आहे. मुंबईत २२ कॅरेट सोने ८९,३४० रुपये तर २४ कॅरेट सोने ९७,०३० रुपये प्रति दहा ग्रॅम दराने विकले जात आहे.

हैदराबादमध्ये २२ कॅरेट सोने ८९,३४० रुपये तर २४ कॅरेट सोने ९७,०३० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे. चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोने ८९,३४० रुपये तर २४ कॅरेट सोने ९७,०३० रुपये दराने विकले जात आहे. बेंगळुरूमध्ये २२ कॅरेट सोने ८९,३४० रुपये तर २४ कॅरेट सोने ९७,०३० रुपये दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये २२ कॅरेट सोने ८९,३४० रुपये दराने विकले जात आहे तर २४ कॅरेट सोने ९७,३०३ रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment