---Advertisement---
जळगाव : सोन्याच्या भावात दोन दिवसात ८०० रुपयांची वाढ होऊन ते सर्वकालीन उच्चांकासह एक लाख एक हजार रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदी एक हजार २०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख १४ हजार ५०० रुपयांवर पोहोचली आहे.
४ ऑगस्ट रोजी सोने एक हजार ७०० रुपयांनी वधारून एक लाख २०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर पुन्हा २०० रुपये अशी दोन दिवसात ८०० रुपयांनी वाढ होऊन सोने एक लाख एक हजार रुपये तोळ्यावर पोहोचले आहे.
दुसरीकडे ४ ऑगस्ट रोजी एक हजार रुपयांची वाढ होऊन एक लाख १३ हजार रुपयांवर पोहोचलेल्या चांदीच्या भावात ५ ऑगस्ट रोजी ३०० रुपयांची व ६ ऑगस्ट रोजी एक हजार २०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी एक लाख १४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
दरम्यान, यापूर्वी २३ जुलै व ५ ऑगस्ट रोजी सोने एक लाख ८०० रुपयांवर होते. एक तोळे सोन्यासाठी जीएसटीसह आता एक लाख चार हजार ३० रुपये मोजावे लागणार आहे.