---Advertisement---
जळगाव : सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली असून सोने १०००, तर चांदी २५०० रुपयांनी वधारली आहे. यामुळे सोने १ लाख ६०० रुपये प्रतितोळा, तर चांदी १ लाख १७ हजार ५०० रुपये प्रती किलोवर पोहोचली असून, चांदीच्या भावातील हा नवा उच्चांक आहे. परिणामी ऐन सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे.
जळगाव सुवर्णपेठेत तीन दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात वाढ होत आहे. यामध्ये सोन्याच्या भावात २१ ऑगस्ट रोजी ३०० रुपये, २२ रोजी १०० रुपयांची वाढ होऊन ते ९९ हजार ६०० रुपयांवर पोहोचले होते. आता त्यात पुन्हा एक हजार रुपयांची वाढ होऊन ते १ लाख ६०० रुपये प्रती तोळ्यावर पोहोचले आहे.
चांदीच्या भावातील हा नवा उच्चांक
दुसरीकडे चांदीच्या भावात २१ ऑगस्ट रोजी २ हजार, २२ रोजी १ हजार रुपयांची वाढ होऊन ती १ लाख १५ हजार रुपयांवर पोहोचली होती. आता त्यात पुन्हा २ हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती १ लाख १७हजार ५०० रुपये प्रती किलोवर पोहोचली आहे. चांदीच्या भावातील हा नवा उच्चांक आहे. या पूर्वी चांदी १ लाख १६ हजार रुपयांपर्यंत पोहोचली होती. सध्याच्या भावानुसार एक किलो चांदीसाठी जीएसटीसह १ लाख २१ हजार २५ रुपये मोजावे लागणार आहे.