---Advertisement---
Gold Rate : गेल्या अनेक दिवसांपासून सोन्यासह चांदीच्या दारात सातत्याने वाढ होत आहे. परिणामी ऐक सणासुदीत दागिने खरेदीच्या प्लॅन करणाऱ्या ग्राहकांवर डोक्याला हात मारण्याची वेळ आली आहे. जळगाव सुवर्णपेठेत सोने दरात २४०० रुपये (विनाजीएसटी) प्रति १० ग्रॅम वाढ, तर चांदी दरात तब्बल ५ हजार रुपये (विनाजीएसटी) प्रति किलो इतकी वाढ झाली आहे.
जळगाव सुवर्णपेठेत २४ कॅरेट सोने दर विनाजीएसटी प्रति तोळा १ लाख १० हजार ३०० रुपयांवर पोहोचले आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (८ सप्टेंबर) १ लाख ८ हजार रुपये इतका होता. तर चांदी विनाजीएसटी १ लाख ३० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (८ सप्टेंबर) चांदीचा दर एक किलोचा दर १ लाख २४ हजार ५०० रुपये इतका होता.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोने १,११,४३० रुपये प्रति १० ग्रॅम दराने, २२ कॅरेट सोने १,०२,१५० रुपयांवर पोहोचले आहे, तर आर्थिक राजधानी मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकातामध्ये २४ कॅरेट सोने १,११,२८० रुपयांवर पोहोचले आहे. तर २२ कॅरेट सोने १,०२,००० रुपये दराने आहे.
काय आहे कारण?
सोन्याच्या किमतीने घेतलेली मोठी उसळी ही अमेरिकेतील व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे असल्याचे सांगितले जात आहे. १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत फेडरल रिझर्व्ह व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात करू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.