---Advertisement---
Gold rate : यंदाच्या दिवाळीत सोन्याने एक नवीन विक्रम गाठला आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दबाव आणि गुंतवणूकदारांच्या उपस्थितीमुळे सोन्याच्या किमती वाढल्या आहेत, तर भारतातील शुद्धतेवर आधारित भिन्न दरांचाही लोकांच्या खिशावर परिणाम झाला आहे.
जळगाव सुवर्णपेठेत आज २२ कॅरेट सोने दरात चांगलीच वाढ झाली आहे. २२ कॅरेट प्रति एक तोळा सोन्याच्या दरात ३,०५० रुपयांनी वाढ होऊन ते १,२१,७०० रुपयांवर पोहोचले आहे. तर १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात २,५०० रुपयांनी वाढ होऊन ते ९९,५८० रुपयांवर पोहोचले आहे.
दिल्लीमध्ये ४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३२,७७० रुपये झाला आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,२१,७०० रुपये झाला आहे. गेल्या वर्षी, त्याच वेळी, हे दर अनुक्रमे ८०,६१० रुपये होते, ज्यामुळे वर्षानुवर्षे अंदाजे ६८% वाढ झाली आहे.
चांदीच्या किमतीत घसरण
दुसरीकडे, चांदीच्या किमतीत घसरण झाली. १७ ऑक्टोबर रोजी चांदीच्या किमती प्रति किलोग्रॅम १,८५,००० रुपये झाल्या. आज बाजारात ४,००० रुपयांची घसरण झाली आहे.