तरुण भारत लाईव्ह ।०७ फेब्रुवारी २०२३। सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरु आहे. काल सोमवारी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली. मात्र आज दुसऱ्या दिवशी दोन्ही धातूंच्या किमतीत वाढ झाली आहे. आजच्या वाढीनंतर सोन्याचा भाव 57 हजार रुपये प्रति तोळ्यावर गेला आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 11 वाजेपर्यंत सोने 0.21 टक्क्यांनी महागले आहे. तर चांदी 0.18 टक्क्यांनी महागली.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोने-चांदीचा दर?
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 11 पर्यंत सोने 115 रुपायांनीं वाढले आहे. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर 57,070 रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत 135 रुपयाची वाढ झाली आहे त्यामुळे चांदी 67,534 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
सोन्याचा दर आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा किती खाली आहे ते जाणून घ्या
सोने आजवरच्या उच्चांकावरून 1800 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. यापूर्वी 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 58,882 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी 7500 रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकाच्या खाली व्यवहार करत आहे. एप्रिल 2011 मध्ये चांदीने 75,000 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला.
गेल्या आठवड्याभरात सोने-चांदी किती महागली?गेल्या व्यावसायिक आठवड्यात सोन्याच्या दरात जवळपास 800 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 1400 रुपयापर्यंतची वाढ झाली आहे.
जळगावातील दर
जळगाव सवर्णनगरीत साेन्याचे दर 57,700 हजार रुपये प्रतिताेळा तर दुसरीकडे चांदीचा दर 68200 रुपये प्रति किलो इतका आहे.