Gold Price Today 27 May 2025 : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियनच्या वस्तूंवरील ५० टक्के कर बंदी घातल्यानंतर, गुंतवणूकदारांनी आता सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याकडे पाठ फिरवली आहे. त्याचा थेट परिणाम सोने आणि चांदीच्या आधीच वाढत्या किमतींवर दिसून येत आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत २४ कॅरेट सोने दर ९६,००० ( जीएसटीसह ९८८८०) रुपयांवर, तर चांदीचा दर प्रति किलो ९९००० रुपये इतका आहे.
मुंबईत सोने दर प्रति किलो १०० रुपयांनी वाढ झाली असून, आता १,००,००० रुपयांवर व्यवहार करत आहे. तर एमसीएक्सवर सोने प्रति १० ग्रॅम ९६,०१८ रुपये दराने विकले जात आहे. त्याचप्रमाणे, सुरुवातीच्या व्यवहारात चांदीचा भाव ०.१३ टक्क्यांनी घसरून ९८,०९० रुपये प्रति किलो झाला आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत २२ कॅरेट सोने ८९,६४० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ९७,७८० रुपये आहे. जयपूरमध्ये २२ कॅरेट सोने ८९,६४० रुपयांना विकले जात आहे तर २४ कॅरेट सोने ९७,७८० रुपयांना विकले जात आहे.
अहमदाबादमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ८९,५४० रुपयांवर आहे तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ९७,६८० रुपयांवर आहे. पटना येथे २२ कॅरेट सोने ८९,५४० रुपयांना विकले जात आहे तर २४ कॅरेट सोने ९७,६८० रुपयांना विकले जात आहे.
हैदराबादमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ८९,४९० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत ९७,६३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोने ८९,४९० रुपयांना विकले जात आहे तर २४ कॅरेट सोने ९७,६३० रुपयांना विकले जात आहे.
आयटी सिटी बेंगळुरूमध्ये २२ कॅरेट सोने ८९,४९० रुपयांना विकले जात आहे तर २४ कॅरेट सोने ९७,६३० रुपयांना विकले जात आहे. तर कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ८९,४९० रुपये आहे. त्याच वेळी, २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ९७,६३० रुपये दराने विकले जात आहे.