तरुण भारत लाईव्ह । मुंबई : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुमचाही गोल्ड खरेदी करण्याचा विचार असेल तर आज सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याचा भावात मोठी वाढ झाली असून सोन पुन्हा 61 हजारांवर गेला आहे. सोबतच चांदीची वधारली आहे.
MCX मध्ये सोने आणि चांदी किती महाग आहे
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सकाळी सोन्याचा भाव 0.73 टक्क्यांच्या वाढीसह 61,411 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. यासोबतच चांदीच्या दरात 1.12 टक्क्यांनी वाढ झाली असून, त्यानंतर चांदीचा भाव 77,442 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचला आहे.
फेड व्याजदरात वाढ होण्याची चिन्हे नाहीत
अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात आणखी वाढ होणार नसल्याचे संकेत दिल्यानंतर गुरुवारी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावाने सुरुवातीच्या व्यवहारात नवा विक्रम नोंदवला. जागतिक बाजारपेठेबद्दल बोलायचे झाले तर येथे सोने विक्रमी उच्चांकी पातळीवर व्यवहार करत आहे.
जळगावातील सोने चांदीचा दर
जळगावमध्येही सोने आणि चांदीच्या किमतीने मोठी उसळी घेतली आहे. सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 61,400 ते 61,500 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. तर एक किलो चांदीचा दर 76,400 ते 76,500 हजार रुपयांवर (विनाजीएसटी) गेला आहे. आगामी दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 63000 ते 65000 हजारापर्यंत जाणार असायचा अदांज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सोने खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.