तरुण भारत लाईव्ह । २४ जानेवारी २०२३। भारतीय बाजारात मौल्यवान सोन्याच्या भावाने उच्चांकी गाठली आहे. ऐन लग्नसमारंभात सोन्याचे भाव अचानक वाढल्याने सर्वसामांन्याचे खर्च आता जास्त होणार आहे. चला तर जाणून घेऊया आजचे दर तरुण भारत’च्या माध्यमातून.
सोन्याचा भराव प्रचंड वाढला असून सोन्याचे बार, बिस्किटे आणि दागिन्यांच्या किंमती वाढल्या आहे. सोन्याच्या दराने आज सर्वात जास्त उच्चांक गाठला आहे. सोन्याचे भाव तब्ब्ल ५७ हजार पर्यंत पोहोचले आहे. आज व्यवसायाच्या सुरुवातीच्या काही मिनिटांत सोन्याने ५७ हजार ०४६ रुपयांपर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली. त्याचबरोबर चांदीची किंमत गेल्या बंदच्या तुलनेत ३१६ रुपये किंवा ०.४६ टक्क्यांनी वाढून ६८ हजार २८० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात चांदीने ७० हजार रुपयांची पातळीही ओलांडली होती, मात्र आता त्या पातळीवरून किंमतींत घसरण झाली आहे.
भाव वाढण्याचे काय कारण?
सोन्याचे भाव वाढण्याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोने दरात तेजीने व्यवसाय होत आहे. आज कोमॅक्सवर सोन्याचा भाव ५.५५ डॉलर किंवा ०.३० टक्क्यांच्या वाढीसह १९३४.९५ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत असताना चांदीची चमकही वाढली आहे. कोमॅक्सवर चांदी ०.४२ टक्क्यांनी वधारून २३.६५२ डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.