---Advertisement---
Jalgaon Gold Rate : जळगाव सुवर्णपेठेत देखील सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट प्रति १ तोळा सोन्याचे दर १,३७० रुपयांनी वाढून ते १,२०,७७० रुपयांवर पोहोचले आहे.
२२ कॅरेट प्रति १ तोळा सोन्याच्या दरार १,२५० रुपयांनी वाढ होऊन ते १,१०,७०० रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. तर १ किलो चांदीच्या दरात १००० रुपयांनी वाढ होऊन ती १,५६,००० रुपयांवर पोहोचली आहे.
देशातील वायदा बाजार, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ होत आहे. सकाळी ९:२५ वाजता सोन्याच्या किमती १,३७७ रुपयांनी वाढून १,१९,४९० रुपयांवर पोहोचल्या. ट्रेडिंग सत्रादरम्यान, सोन्याच्या किमती १,३९८ रुपयांनी वाढून १,१९,५११ रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी सोन्याच्या किमती १,१८,११३ रुपयांवर बंद झाल्या. ऑक्टोबरमध्ये, सोन्याच्या किमती अंदाजे २% किंवा २,२४६ रुपयांनी वाढल्या आहेत.
दिल्लीच्या स्पॉट मार्केटमध्ये सोमवारी चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. सकाळी ९:२५ वाजता, चांदीच्या किमती १,६८० रुपयांनी वाढून १,४७,४२४ रुपयांवर पोहोचल्या. सत्रादरम्यान, चांदीच्या किमती १,९५६ रुपयांनी वाढून १,४७,७०० रुपये प्रति किलोग्रॅमच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या. ऑक्टोबरमध्ये, चांदीच्या किमती ३.९० टक्के किंवा ५,५५५ रुपयांनी वाढल्या आहेत.
---Advertisement---









