---Advertisement---
Gold Price Today : सोन्याच्या किमतीत वाढ सुरूच असून, आज ५ सप्टेंबर रोजी देशभरात २४ कॅरेट सोने १,०७,६२० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोने ९८,६५० रुपये आणि १८ कॅरेट सोने ८०,७२० रुपयांवर पोहोचले आहे.
जळगावच्या सुवर्णपेठेत २४ कॅरेट सोने दर प्रति तोळा एक लाख ०६,९०० रुपयांवर, तर २२ कॅरेट सोने दर प्रति तोळा ९७ हजार ९२० रुपयांवर पोहोचले आहे. दुसरीकडे, चांदीचा दर काही दिवसांपासून स्थिर असून, ती प्रति किलो एक लाख २४,५०० रुपयांवर पोहोचली आहे.
दिल्लीत २४ कॅरेट सोने १,०७,७७० रुपये प्रति १० ग्रॅम दराने आहे. २२ कॅरेट सोने ९८,८०० रुपये आणि १८ कॅरेट सोने ८०,८४० रुपये आहे.
मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, केरळ, पुणे, कोइम्बतूर, मदुराई, विजयवाडा, नागपूर आणि भुवनेश्वर येथे २४ कॅरेट सोने १,०७,६२० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोने ९८,६५० रुपये आणि १८ कॅरेट सोने ८०,७२० रुपयांवर आहे.