---Advertisement---

Gold Price : ग्राहकांना मोठा दिलासा! सोन्याच्या किमतीत पुन्हा घसरण, जाणून घ्या दर

---Advertisement---

---Advertisement---

Gold Price : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्ट रोजी दिलेल्या टॅरिफ डेडलाइनपूर्वीच अनेक देशांशी व्यापार केला आहे. जगभरातील भू-राजकीय तणावदेखील कमी होत आहेत. त्यातच अमेरिकन डॉलर मजबूत होत असताना, दुसरीकडे, गुंतवणूकदार आता सोन्याऐवजी इतरत्र गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे सोन्याच्या किमतीत घट होत असून, सोने पून्हा १ लाख रुपयांच्या खाली आले आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,००,००० रुपये दराने आहे. तर २२ कॅरेट सोने ९१,७४० रुपये दराने आहे. आर्थिक राजधानी मुंबईत २४ कॅरेट सोने ९९,९२० रुपये आणि २२ कॅरेट सोने ९२,५४० दराने आहे.

चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोने ९९,९२० रुपये प्रति १० ग्रॅम तर २२ कॅरेट सोने ९१,५९० रुपये दराने आहे. कोलकातामध्येही २४ कॅरेट सोने ९९,९२० रुपये दराने आणि २२ कॅरेट सोने ९२,५४० रुपये दराने आहे.

पटनामध्ये २४ कॅरेट सोने ९९,९२० रुपये दराने आहे, तर २२ कॅरेट सोने ९१,५९० रुपये दराने आहे. बेंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोने ९९,९२० रुपये दराने आहे, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ९१,५९० रुपये आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---