---Advertisement---

Gold Rate : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव घसरले, जाणून घ्या ताजे दर

---Advertisement---

Gold Rate : सोने खरेदीच्या विचारात असलेल्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. कारण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात घसरण झाली आहे. यामुळे सोने खरेदीच्या तयारीत असलेल्या ग्राहकांना काहीचा दिलासा मिळाला आहे.

आज सोमवारी (२६ मे) रोजी सोने दरात प्रति तोळा ४४० रुपयांनी घसरण झाली आहे. चांदी दरातही घसरण झाली असून, सध्या चांदी दर ९७,८७८ रुपये प्रति किलोने आहे. सोने दरात झालेल्या घसरणीनंतर एक तोळा सोन्याचे दर ९७,६४० रुपये आहे. तर रविवारी (२५ मे) रोजी हे दर ९८,०८० रुपये होते. आज सोमवारी (२६ मे) रोजी सोने दरात प्रति तोळा ४४० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोने दरात ३५२ रुपयांनी घसरण झाली असून सध्याचे दर ७८,११२ रुपये आहेत.

तर २२ कॅरेट सोने दरात ४०० रुपयांनी घसरण झाली असून, सध्या १ तोळा दर ८९,५०० रुपये आहेत. १८ कॅरेट सोने दरात ३३० रुपयांनी घसरण झाली असून, १ तोळा सोने ७३,२३० रुपये प्रति तोळ्यावर विकले जात आहे.

हेही लक्षात घ्या

ग्राहकांनो, हे दर सराफा बाजाराचे आहेत. किरकोळ ग्राहकांसाठी, मेकिंग चार्जेस, कर आणि जीएसटी देखील त्यात जोडले जाऊ शकतात. याचा अर्थ असा की जर तुम्ही दागिने खरेदी करण्यासाठी बाजारात गेलात तर तुम्हाला या किमतीत बदल पाहावयास मिळू शकतो.

एका वर्षात सोन्याच्या किमतीत ३० टक्क्यांनी वाढ

गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, गेल्या एका वर्षात सोन्याने सुमारे ३० टक्के परतावा दिला आहे. दीर्घकालीन बाबींबद्दल बोलायचे झाले तर, २००१ पासून आतापर्यंत सोन्याने सरासरी १५ टक्के CAGR परतावा दिला आहे. १९९५ पासून, सोने दरवर्षी महागाईपेक्षा २-४ टक्के जास्त परतावा देत आहे.

चांदीबद्दल बोलायचे झाले तर, गुंतवणूकदारांनाही त्याचा खूप फायदा झाला आहे. अक्षय्य तृतीया २०२४ ते २०२५ दरम्यान चांदीच्या किमतीत १५.६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषतः २०२१ मध्ये, चांदीने ६९.०४ टक्क्यांची जबरदस्त वाढ नोंदवली होती. २०२० पासून आतापर्यंत, चांदीची सरासरी २० टक्के CAGR वाढ झाली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment