---Advertisement---
Gold Rate : गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात वाढ झाली असून, यामुळे सोने सर्वकालीन उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे.
आज, २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत १६० रुपयांची वाढ झाली आहे, तर २२ कॅरेट सोन्यात १५० रुपयांची वाढ झाली आहे आणि १८ कॅरेटमध्ये १२० रुपयांची वाढ झाली आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोने १,०२,७५० रुपयांवर पोहोचले आहे, तर आर्थिक राजधानी मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, केरळ आणि पुणे येथे ते १,०२,६०० रुपयांवर पोहोचले आहे. दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ९४,२०० रुपये आणि मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, केरळ आणि पुण्यात प्रति १० ग्रॅम ९४,०५० रुपये आहे.
त्याचप्रमाणे, १८ कॅरेट सोन्याचा दर दिल्लीमध्ये ७७,०८० रुपये, चेन्नईमध्ये ७७,७५० रुपये आणि मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, केरळ, पुणे आणि वडोदरा येथे ७६,९९० रुपयांना उपलब्ध आहे.