---Advertisement---
Gold Rate जळगाव : अमेरिकन बँकांचे व्याजदर कमी करण्यात आल्याने सोने खरेदीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. अमेरिकेने 50% भारतावर टेरीप लावला असून त्याचा थेट परिणाम सुवर्णनगरीवर झाला आहे. काही ग्राहक सोने खरेदी न करताच परतल्याने यावेळी दिसून आले.
अमेरिकन बँकांनी व्याजदरात कपात केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परिणामी जळगावच्या सुवर्णनगरीत दररोज सोन्याचे भाव वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आज शनिवारी (२० सप्टेंबर ) शहरात 10 ग्रॅम सोन्याचा दर १ लाख १४ हजार ३०० रुपये (जीएसटीसह) इतका नोंदवला गेला. अल्पावधीत भावामध्ये झालेली ही वाढ ग्राहकांसाठी धोक्याची घंटा असली तरी नवरात्र उत्सवाच्या तोंडावर सुवर्णनगरीतील सराफ बाजार मात्र ग्राहकांची तुरळ गर्दी पाहायला मिळत आहे
ग्राहकांकडून काही प्रमाणात वेट अँड वॉच भूमिकेत आहे. नवरात्र, दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण तोंडावर आल्याने खरेदी टाळणे अनेकांसाठी शक्य नाही. त्यामुळे भाव वाढले तरी ग्राहकांचा ओघ कायम असल्याचे सुवर्ण व्यवसायिकांनी सांगितले.जळगावमधील अग्रगण्य सुवर्णव्यवसायिकांच्या मते, अमेरिकन व्याजदर कपातीमुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील या चढउतारांचा थेट परिणाम जळगाव बाजारपेठेवर होत असून, भावात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सोने ग्राहक सुनीता पाटील यांनी सांगितले की, सोन्याच्या भावात वाढ होत आहे. हे भाव आमच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. सोने घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. भाव वाढल्याने आम्ही सोने खरेदी न करताच परत जात आहोत. सोन्याचे दर कमी व्हावे अशी इच्छा आहे.