---Advertisement---

Gold Rate : घसरणीनंतर सोन्याच्या दरात पुन्हा बदल, जाणून घ्या दर

---Advertisement---

Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत होती. मात्र आज म्हणजेच २ जुलै रोजी पुन्हा त्यात वाढ होताना दिसून आली आहे. २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ९८,४१० रुपये, २२ कॅरेट सोने ९०,२१० रुपये, १८ कॅरेट सोने ७३,८१० रुपये झाले आहे. तर, चांदीची किंमत १,१०,१०० रुपये प्रति किलो झाली आहे.

जळगावमध्ये सोने दरात १४४२ रुपयाची वाढ झाली असून, २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ९७६०० ( जीएसटीसह १,००,५२८) गेले आहेत, तर चांदी १ हजाराने वाढून १,१०, २१० रुपये किलो झाली आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ९८,५६० रुपये दराने विकले जात आहे, तर २२ कॅरेट सोने ९०,३६० रुपये आणि १८ कॅरेट सोने ७३,९४० रुपये दराने विकले जात आहे.

आर्थिक राजधानी मुंबई तसेच चेन्नई, कोलकाता आणि आयटी सिटी बेंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोने ९८,४१० रुपयांना विकले जात आहे. दुसरीकडे, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि बेंगळुरूमध्ये २२ कॅरेट सोने ९०,२१० रुपयांना विकले जात आहे.

मुंबईत १८ कॅरेट सोने ७३,८१० रुपये, चेन्नईमध्ये ७४,४१० रुपये, कोलकातामध्ये ७३,८१० रुपये आणि बेंगळुरूमध्ये ७३,८१० रुपये प्रति १० ग्रॅमला विकले जात आहे. त्याचप्रमाणे, २४ कॅरेट सोने चंदीगडमध्ये ९८,५६० रुपये, हैदराबादमध्ये ९८,४१० रुपये आणि अहमदाबादमध्ये ९८,४६० रुपयांना विकले जात आहे. दुसरीकडे, चंदीगडमध्ये २२ कॅरेट सोने ९०,३६० रुपये, अहमदाबादमध्ये ९०,२१० रुपये आणि ९०,२६० रुपयांना विकले जात आहे.

तर, १८ कॅरेट सोन्याचा भाव हैदराबादमध्ये ७३,८१० रुपये, अहमदाबादमध्ये ७३,८१० रुपये, अहमदाबादमध्ये ७३,८५० रुपये आणि भोपाळमध्ये ७३,८५० रुपये आहे. तर, दिल्ली, बेंगळुरू, मुंबई, हैदराबाद तसेच चेन्नईमध्ये चांदी १,१०,१०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---