---Advertisement---
Gold Rate : सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर, आज, १९ सप्टेंबर २०२५ रोजी सोन्याच्या किमती पुन्हा एकदा चमकल्या आहेत. एमसीएक्सवर सोन्याचा भाव ४२१ रुपयांनी वाढून १,०९,४७३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तरचांदी १,६४४ रुपयांनी म्हणजेच १.३ टक्क्यांनी वाढून १,२८,७५५ रुपये प्रति किलो झालीअसून, चांदीने १,३०,२८४ रुपये प्रति किलोचा सर्वोच्च उच्चांक गाठला आहे.
जळगाव सुवर्णपेठेत २२ कॅरेट सोने प्रति तोळा १,००,९४० रुपये, तर २४ कॅरेट सोने प्रति तोळा १,१०,२०० रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदी प्रति किलोवर १,२९,५०० रुपयावनर पोहोचली आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि जयपूरमध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅमवर १,११,४८० रुपयांवर आहे, तर २२ कॅरेट सोने १,०२,२०० रुपयांवर आहे.
त्याचप्रमाणे, अहमदाबाद, मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता येथे २४ कॅरेट सोने १,११,३३० रुपयांना आहे, तर २२ कॅरेट सोने १,०२,५०० रुपयांवर आहे.बातमी अपडेट होत आहे