Gold Rate : सोने खरेदी करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण मंगळवारी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. मात्र, चांदीच्या दरात वाढ झाली असून, ती आता १,०८,१०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.
मुंबईत २४ कॅरेट सोने ९७,६८० रुपयांवर आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८९,५४० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोने ८९,६९० रुपयांवर आहे तर २४ कॅरेट सोने ९७,८३० रुपयांना विकले जात आहे. बेंगळुरूमध्ये २२ कॅरेट सोने ८९,५४० रुपये तर २४ कॅरेट सोने ९७,६८० रुपयांना विकले जात आहे.
चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोने ८९,५४० रुपये तर २४ कॅरेट सोने ९७,६८० रुपयांना विकले जात आहे. पुण्यात २२ कॅरेट सोने ८९,५४० रुपये तर २४ कॅरेट सोने ९७,६८० रुपयांना विकले जात आहे. अहमदाबादबद्दल बोलायचे झाले तर, येथे २२ कॅरेट सोने ८९,५४० रुपये तर २४ कॅरेट सोने ९७,७३० रुपयांना विकले जात आहे.
कोलकातामध्ये २२ कॅरेट सोने ८९,५४० रुपये तर २४ कॅरेट सोने ९७,६८० रुपयांना विकले जात आहे. हैदराबादमध्ये २२ कॅरेट सोने ८९,५४० रुपयांना विकले जात आहे तर २४ कॅरेट सोने ९७,६८० रुपयांना विकले जात आहे.
दरम्यान, सोन्याची किंमत अनेक घटकांवर अवलंबून असते. यामध्ये विनिमय दर, डॉलरच्या किमतीतील चढउतार, कच्चे तेल आणि सीमाशुल्क यांचा समावेश आहे. याशिवाय, भारतीय समाजात सोने हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. देशातील कोणत्याही लग्न किंवा सणात सोने खूप शुभ मानले जाते. याशिवाय, जागतिक अस्थिरतेचा देखील सोन्याच्या किमतींवर थेट परिणाम होतो. गुंतवणूकदार इतर कोणत्याही तुलनेत त्यात गुंतवणूक करणे सर्वात फायदेशीर मानतात कारण त्यात जोखीम खूप कमी असते.