Gold Rate: गेल्या आठवड्यात सोन्यात घसरण झाली होती पण आठवड्याच्या शेवटी ती वाढू लागली. नवीन आठवड्याच्या पहिल्या दिवशीही हीच वाढ दिसून येत आहे.गेल्या १० दिवसांत २४ कॅरेट १० तोळं सोन्याचा दर तब्बल ४८,३०० रुपयांनी घसरला आहे.
का होतेय सोन्यात घसरण ?
गेल्या आठवड्यात सोन्याचे भाव कमी झाले होते पण आता वाढ होत आहे. याचे कारण म्हणजे जगभरात परिस्थिती थोडी शांत झाली आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव कमी झाला आहे, ज्यामुळे सोन्याच्या मागणीत थोडीशी घट झाली आहे. लोक आता सोन्यात गुंतवणूक करण्याऐवजी शेअर बाजारासारख्या पर्यायांकडे वळत आहेत
दरम्यान, शुक्रवारच्या तुलनेत आज सोन्याचा भाव ३५० रुपयांनी वाढला आहे. आज भारतात २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ९५,५१० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८७,५५० इतका आहे. आज भारतात चांदीचा दर प्रति ग्रॅम ९६.९० आणि प्रति किलोग्रॅम ९६,९०० रुपये इतका आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याचे दर वाढले आहे.
सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?
आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती, सरकारी कर आणि रुपयाच्या मूल्यातील चढ-उतार अशा अनेक कारणांमुळे भारतातील सोन्याची किंमत बदलत राहते. सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही तर ते आपल्या परंपरा आणि सणांचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः लग्न आणि सणांच्या वेळी त्याची मागणी वाढते.