---Advertisement---
Gold Rate : जळगावच्या सुवर्णपेठेत चार दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरू असलेली वाढ कायम आहे. परिणामी एक तोळे घेण्यासाठी आता जीएसटीसह १,०३,००० रुपये मोजावे लागणार आहे. दुसरीकडे चांदीच्या दरातदेखील एक हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख सात हजार ५०० रुपयांवर पोहोचली आहे.
सोने १३ जून रोजी दोन हजार ६०० रुपयांची वाढ होऊन ते ९९ हजार ८०० रुपये झाले. १४ जून रोजी सकाळी सोन्याच्या भावात १०० रुपयांची घसरण होऊन ते ९९ हजार ७०० रुपयांवर आले. मात्र, दुपारी २०० रुपयांची वाढ होऊन सोने ९९ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. संध्याकाळी त्यात पुन्हा १०० रुपयांची पुन्हा वाढ झाली व सोने एक लाख रुपये प्रति तोळा अशा नव्या विक्रमी भावावर पोहचले.
सोने भाववाढीचा वेग
५० ते ६० हजार – १३ महिने २० दिवस
६० ते ७० हजार – एक वर्ष
७० ते ८० हजार – ९ महिने १८ दिवस
८० ते ९० हजार – दोन महिने ९ दिवस
२० हजार ते एक लाख दोन महिने १४ दिवस
दरम्यान, दिवाळीपासून सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ सुरू झाली. सोबतच अमेरिकेतील आर्थिक धोरण, विविध देशातील युद्ध, तणाव यांची भर पडूनही मौल्यवान धातूंचे भाव मधला एक पंधरवडा वगळता वाढतच गेले.