बाईईई…! जळगावात सोन्याच्या किमतीने मोडले सगळे रेकॉर्ड

जळगाव। सोने आणि चांदीमध्ये दरवाढ सुरूच आहे. दिवाळी सण आता काही दिवसांवर आला असता त्यापूर्वी सोन्याचं किमतीने सगळे रेकॉर्ड मोडले आहे. सोन्यासाठी प्रसिद्ध झालेल्या जळगाव सुवर्ण बाजारात सोन्याच्या किमतीने ८० हजार (जीएसटीसह) रुपयाचा टप्पा गाठला आहे. यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी प्लॅन करणाऱ्या ग्राहकांचा खिसा आणखी खाली होणार आहे.

सणासुदीच्या दिवसात सोने-खरेदी करणे शुभ मानले जाते. विशेषतः दिपावली पाडव्याला जास्त प्रमाणात सोने-खरेदी केले जाते. मात्र त्यापूर्वी सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतली. जळगाव सराफ बाजारात गेल्या तीन दिवसात सोने दरात प्रति तोळा १७०० रुपयाची वाढ झाली. तर काल शुक्रवारी सोने दरात ९०० रुपयाची वाढ झाली

यामुळे सध्या यामुळे सोने सर्वाधिक उच्चांकी प्रती तोळा ८०३४० (जीएसटीसह) रुपयांवर पोहचले आहेत. तर विनाजीएसटी सोन्याचा दर ७८००० रुपये इतका आहे. दुसरीकडे चांदीच्या दरातही एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे चांदीचा दर ९४,००० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. ईस्त्राईल-हमास युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत असून युद्धाचा भडका आणखी उडाल्यास दिवाळीत सोने आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोन्याचा दर ८५ हजार रुपयाचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तविली जात आहे .