जळगाव । दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सोने-चांदीच्या भावात घसरण सुरूच असून, सलग दुसऱ्या दिवशी जळगाव सुवर्णपेठेत सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे.
जळगाव सुवर्णपेठेत मंगळवार, २६ रोजी सोने भावात एक हजार ४०० रुपयांची घसरण होऊन ते १० ग्रॅमसाठी ७६ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर आले. चांदीच्याही भावात एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ८९ हजार रुपये प्रतिकिलोवर आली. सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी भावात मोठी घसरण झाली. दोन दिवसांत मिळून सोने व चांदी हे दोन्ही मौल्यवान धातू २,७०० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. आज सकाळच्या सत्रात चांदीचा एक किलोचा भाव ९१,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
गेल्या आठवड्यात सोन्याने मोठी भरारी घेतली. १८ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सत्रात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ७५००० रुपये इतका होता. आठवड्याच्या अखेरीस सोन्याचा भाव ७८,६०० रुपयावर पोहोचला होता. तर चांदीचा भाव आठवड्याभरात २००० हजारांनी वाढला होता. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही धातूंमध्ये घसरण झाली.
सोमवार, २५ रोजी सोने एक हजार ३०० रुपयांनी तर चांदीच्या भावात एक हजार २०० रुपयांची घसरण झाली होती. ऑक्टोबर महिन्यापासून सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. त्यानंतर मात्र दोन आठवड्यांपासून भाव कमी-कमी होत गेले.
चांदी आता ८९ हजारांवर आल्याने हे भाव गेल्या सव्वा दोन महिन्यातील सर्वात कमी भाव आहे. यापूर्वी १४ सप्टेंबर रोजी चांदी ८८ हजार ६०० रुपये होती. त्यानंतर तिचे भाव वाढतच गेले होते. आज सकाळच्या सत्रात चांदीचा एक किलोचा भाव ९१,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.