सोने-चांदीच्या किंमती धपकन आपटल्या; जळगावात एकाच दिवशी मोठी घसरण

जळगाव । तुम्हीही सोने आणि चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. गेल्या आठवड्यानंतर आता या आठवड्याच्या सुरुतीपासूनच दोन्ही धातूंच्या किंमती जोरात आपटल्या.

जळगावच्या सुवर्णनगरीत सोमवारी सोने ६०० रुपयांनी स्वस्त झाले. तर मंगळवारी किंमतीत पुन्हा मोठी घसरण झाली. सोने खाली आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जळगाव सराफ बाजारात मंगळवारी सोने दरात १६०० रुपयांची घसरण झाल्याने आज बुधवारी सकाळच्या सत्रात सोने ७६ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर आले. तसेच चांदीचा भाव २००० रुपयांनी घसरून विनाजीएसटी ८९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. सोने भाव तर महिनाभराच्या नीच्चांकीवर आले आहे. ११ ऑक्टोबर रोजी ते ७६ हजारांवर होते.

दरम्यान, काल मंगळवारी तुलसी विवाह संपन्न झाला. यांनतर आता लग्नसराईला सुरुवात होणार असून याकाळात सोने आणि चांदीचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.