ग्राहकांनो पळा खरेदीला! दोन दिवसात सोने तब्बल ‘इतक्या’ हजाराने स्वस्त, तपासून घ्या आताचा भाव

जळगाव । सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदवार्ता आहे. सोन्याचा भाव वाढणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असताना २३ जुलै रोजी सादर केलेल्या देशाच्या अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील सीमा शुल्कात कपात केल्यानंतर दोन्ही धातूंच्या किमतीत भलीमोठी घसरण झालीय. जळगावच्या सुवर्णपेठेत दोन दिवसात सोने तब्बल ३५०० रुपयांनी घसरले आहे.

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील सीमा शुल्क 15 टक्क्यांहून 6 टक्के आणले आहे. यामुळे जळगावच्या सराफ बाजारात मंगळवारी सोन्याचा दर २८०० रुपयापर्यंत घसरला होता. तर चांदीचा दर ३ हजार ८०० रुपयांनी घसरले होते. यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सोने ७०० रुपयांनी घसरले. मात्र चांदी दरात ५०० रुपयाची वाढ झाली.

काय आहे आता सोने-चांदीचा भाव?
जळगावात आता २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ७०,००० रुपयांपर्यंत घसरले आहेत. तर चांदीचा एक किलोचा भाव ८६,००० रुपयावर पोहोचले आहे. दरम्यान सोन्याचे दर आणखी कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.