---Advertisement---
जळगाव । गेल्या वर्षी २०२४ मध्ये सोने आणि चांदी दरात आतापर्यंतचे दरवाढीचे सर्व रेकॉर्ड तोडले गेले. या नवीन वर्षात तरी भाव खाली येतील, अशी आशा ग्राहकांना असताना नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. सोबतच चांदीही महागली आहे.
जळगावात काय आहेत भाव?
जळगावच्या सुवर्णपेठत सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले. गुरुवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ६०० रुपयांनी वाढला. यामुळे आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ७१,०५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ७७,५०० रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचले आहे. दुसारिखे चांदीच दर १००० रुपयांनी वाढला असून यामुळे आता एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी ८९००० रुपयावर गेला आहे.
डिसेंबरच्या अखेरच्या टप्प्यात सोने ५०० रुपयापर्यंत महागले. या आठवड्याच्या सुरुवातीला ३० डिसेंबर रोजी सोने १६० रुपयांनी वधारले. मात्र ३१ डिसेंबर रोजी त्यात ३०० रुपयाची घसरण झाली होती. तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी किंचित १०० रुपयांनी सोने महागले होते. तर काल २ जानेवारीला त्यात ६०० रुपयांनी वाढ झाली. मागील दोन दिवसात सोने ७०० रुपयांनी वाढले आहे. तर चांदी दरात १००० ते १५०० रुपयापर्यंत वाढ झालीय.
सोने महाग का झाले?
व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत झालेली वाढ आणि देशांतर्गत बाजारात गुंतवणूकदारांच्या मागणीमुळे ही वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे मत आहे की रुपयाच्या कमकुवतपणामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबुतीमुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळाला आहे. दरम्यान या नवीन वर्षात सोन्याचा भाव ८५ हजार ते ९० हजार रुपयापर्यंत जाणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
---Advertisement---