जागतिक बाजारात सोन्याची पडझड झाली. डॉलरच्या तुलनेत सोने गेल्या पाच महिन्यांच्या निच्चांकावर पोहचले. तर अमेरिकेच्या गंगाजळीत जबरदस्त वाढ झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते गेल्या दहा वर्षांतील हा उच्चांक आहे. अमेरिकेत महागाईला लगाम घालण्याचे प्रयत्न कायम राहतील. येत्या काही दिवसात व्याजदर वाढणार नाहीत पण ते कमी पण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे सोने-चांदी दबावाखाली आले आहे.
सोन्याची ही पडझड भारतीयांच्या पथ्यावर पडली आहे. भारतीय सराफा बाजारात सोने घसरले तर चांदीत किंचित वाढ झाली आहे. सराफा बाजारात खरेदीदारांनी गर्दी केली आहे. भाव वाढ होण्याअगोदर स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी अनेक जण साधून घेत आहे.
ऑगस्ट महिन्यातील दोन आठवड्यात सोन्याला सूर गवसला नाही. सोन्यात पडझड झाली. सोन्यात 1200 रुपयांची घसरण दिसून आली. 1 ऑगस्ट रोजी 150 रुपयांनी सोने वधारले तर 5 ऑगस्ट रोजी सोन्याने 200 रुपयांची उसळी घेतली. 12,13,14 ऑगस्ट रोजी भावात मोठा बदल झाला नाही.
15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजी प्रत्येकी 100 रुपयांची घसरण झाली. 22 कॅरेट सोने 54,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,550 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.
बातमी अपडेट होत आहे