दिवाळीपूर्वी सोने दरात ऐतिहासिक वाढ; जळगावात प्रथमच गाठला ‘हा’ टप्पा?

जळगाव । एकीकडे दिवाळीसारखा सण तोंडावर येऊन ठेपला आहे. दिवाळीत सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते, यामुळेच बहुतेक लोक दिवाळीत सोन किंवा चांदीच्या वस्तूंची खरेदी करतात. मात्र सोने खरेदी करताना ग्राहकांचं दिवाळंच निघणार आहे. कारण दिवाळीपूर्वी सोन्याने नवा उच्चांक गाठला.

जळगाव सुवर्णपेठेत बुधवारी सोन्याच्या किमतीत प्रति तोळा ७०० रुपयांची वाढ तर चांदी प्रति किलो एक हजार रुपयांनी वाधरली आहे. यामुळे सोन्याच्या किमतीने प्रथमच ७७ हजार रुपयाचा टप्पा गाठला आहे. दिवाळीत सोन्याचा दर ८० हजारांचा टप्पा गाठणार असला अंदाज यापूर्वी जाणकारांनी वर्तविला होता. आता तो तंतोतंत खरा होताना दिसत आहे.

जळगाव काय आहे सोने-चांदीचे दर?
आज गुरुवारी सकाळच्या सत्रात २२ कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा ७०,५८६ रुपये प्रति तोळा एवढे आहेत तर २४ कॅरट सोन्याचे दर ७७,००० रुपये प्रति तोळा एवढा आहे. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा दर ७९,३०० रुपयावर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीचा दर ९३००० रुपये प्रति किलोवर आहे. जीएसटीसह चांदीचा दर ९५,७९० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

दरम्यान सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. सध्या आगामी सोन्याचे भाव वाढतच असून, डिसेंबरपर्यंत सोन्याचे दर ८५ हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज सराफा व्यवसायिकांनी व्यक्त केला आहे.