७वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

तरुण भारत लाईव्ह । ७ एप्रिल २०२३।  मुंबई उच्च न्यायालयामार्फत मोठी भरती जाहीर करण्यात आलेली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली. शिपाई/हमाल या पदांसाठी ही भरती होणार असून 7वी पास उमेदवारांसाठी नोकरीची ही मोठी संधी असू शकते. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 160

भरली जाणारी पदे :
शिपाई/हमाल या पदांसाठी ही भरती आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता: उमेदवार हा किमान 07वी उत्तीर्ण.
वयाची अट: 24 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 25 रुपये/-

किती पगार मिळेल? :

निवड झालेल्या उमेदवारांना 15000 ते 47600 पर्यंत पगार दिला आहे. तसेच नियमाप्रमाणे भत्ते मिळतील.

नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 एप्रिल 2023 (05:00 PM)

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना
१. संगणकीकृत प्रोग्रामद्वारे ऑनलाईन अर्जाची छाननी केली जाईल म्हणून ऑनलाईन अर्ज भरणे सुरु करण्यापूर्वी उमेदवाराने शिपाई / हमाल पदासंबंधीची संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. ऑनलाईन अर्ज हा इंग्रजी भाषेत भरला जाईल.
२. ‘शिपाई / हमाल’ पदासाठी इ. ७ वी मधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल. ‘शिपाई/ हमाल’ पदासाठी जर उमेदवार इ. ७ वी ची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता प्राप्त उदा. १० वी किंवा १२ वी असेल व त्याच्याकडे/तिच्याकडे इ. ७ वी चे गुणपत्रक नसेल तर, त्याने/तिने ‘ऑनलाईन’ अर्ज भरताना इ. ७ वी करिता काल्पनिकरित्या ५०% गुणांची (उदा. एकूण १०० पैकी ५० गुण प्राप्त) नोंद करावी जेणेकरुन त्याचा / तिचा अर्ज संगणकाकडून स्विकृत केला जाईल.

अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा