तरुण भारत लाईव्ह । २५ मे २०२३। सशस्त्र सीमा बलाने पदभरती अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार ट्रेडसमन, कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, एएसआय आणि सब इन्स्पेक्टर या पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट वर जाऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जून 2023 आहे. एकूण 1638 पदांच्या भरती केली जाणार आहे.
अभियानांतर्गत हेड कॉन्स्टेबल, ट्रेड्समन, कॉन्स्टेबल, एएसआय, असिस्टंट कमांडंट आणि सब इन्स्पेक्टर या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी लेखी चाचणी, शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. या भरती मोहिमेसाठी अर्ज करणार्या उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठी सर्व उमेदवारांनी प्रथम SSB च्या अधिकृत वेबसाइट ssb.nic.in ला भेट द्यावी. आता मुख्यपृष्ठावरील SSB भर्ती 2023 लिंकवर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा. यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. त्यानंतर अर्जाची फी भरा. आता अर्ज सादर करा. आणि शेवटी अर्जाची प्रिंट आउट घ्या.