भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळेल इतका पगार

तरुण भारत लाईव्ह । ८ मे २०२३।  भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने विविध पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येतील. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2023 आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा त्यांनी अधिकृत वेबसाइट  bel-india.in. ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून BE, B.Tech, B.Sc (चार वर्षे) पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. किंवा अभियांत्रिकीशी संबंधित इतर कोणताही अभ्यासक्रम केला आहे. यासोबतच उमेदवाराला ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहे.

प्रकल्प अभियंता पदाचा पुढील तपशील खालीलप्रमाणे आहे.
इलेक्ट्रॉनिक्स – १६४ पदे
मेकॅनिकल – 106 पदे
संगणक विज्ञान – 47 पदे
इलेक्ट्रिकल – 07 पदे
केमिकल – 01 जागा
एरोस्पेस अभियांत्रिकी – 02 पदे

प्रशिक्षणार्थी अभियंता पदाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
इलेक्ट्रॉनिक्स – 100 पदे
एरोस्पेस अभियांत्रिकी – 01 जागा

एकूण पदे – 428

प्रकल्प अभियंता – I – 327 पदे
प्रशिक्षणार्थी अभियंता – I – 101 पदे

वयोमर्यादा
प्रकल्प अभियंता I पदासाठी वयोमर्यादा 32 वर्षे आणि प्रशिक्षणार्थी अभियंता I या पदासाठी वय मर्यादा 28 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

निवड कशी होईल, किती पगार मिळेल
या पदांवरील निवडीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. यानंतर मुलाखती घेतल्या जातील. निवड झाल्यावर, पगार 40,000 रुपये ते 55,000 रुपये प्रति महिना असतो.

अर्ज शुल्क : [SC/ST/PWD: फी नाही]

  1. पद क्र.1: General/OBC/EWS: ₹400+18% GST
  2. पद क्र.2: General/OBC/EWS: ₹150+18% GST