Golden job opportunity : नोकरीची सुवर्णसंधी! दरमहा पगार मिळेल एक लाख

भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्याने NCC स्पेशल एंट्री स्कीम – ऑक्टोबर 2025 अंतर्गत भरती जाहीर केली असून, यासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2025, दुपारी 3 वाजेपर्यंत आहे.

रिक्त पदांचा तपशील

  • NCC स्पेशल एंट्री (पुरुष) – 70 पदे
  • NCC स्पेशल एंट्री (महिला) – 06 पदे

शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवी पूर्ण केलेली असावी.
  • अंतिम वर्षात शिकणाऱ्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी आहे, मात्र त्यांच्या मागील वर्षाच्या परीक्षेत किमान 50% गुण अनिवार्य आहेत.
  • उमेदवाराने किमान दोन वर्षे NCC मध्ये सेवा दिली असावी आणि त्याच्याकडे वैध NCC प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

    हेही वाचा : शेंदुर्णीत मुख्यमंत्री फडणवीसांची तोफ, शेतकऱ्यांसाठी केल्या मोठ्या घोषणा

वयोमर्यादा

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 जुलै 2025 रोजी 19 ते 25 वर्षांदरम्यान असावे.

परीक्षा शुल्क

नोकरीचे ठिकाण

  • निवड झालेल्या उमेदवारांची भारतभर विविध सैन्य ठिकाणी नियुक्ती केली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 15 मार्च 2025, दुपारी 3 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी

इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर भेट देऊन सविस्तर अधिसूचना वाचावी आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा