सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, एनसीईआरटीमध्ये 347 पदांसाठी भरती

नवी दिल्ली : सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असलेल्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच एनसीईआरटीमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने३४७  पदांच्या भरतीसाठी (NCERT Recruitment 2023) अधिसूचना जारी केली आहे.

NCERT ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 347 पदं भरली जाणार आहेत. ज्यामध्ये पे-मॅट्रिक्स लेवल 2-5 साठी 215 पदांसाठी भरती केली जाणार आहे. लेवल 6-8 साठी 99 पदं आणि लेवल 10-12 साठी 33 पदं भरली जाणार आहेत. या वेगवेगळ्या पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी वेगवेगळी पात्रता आहे. नवी दिल्ली येथील NCERT च्या मुख्यालयासाठी तसेच विविध संस्था आणि प्रादेशिक केंद्रांसाठी ही भरती एकाच वेळी केली जात आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचे आहेत. ते NCERTची अधिकृत वेबसाईट ncert.nic.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 29 एप्रिल 2023 पासून सुरू होणार आहे. तर 6 मे 2023 पर्यंत उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. या भरतीप्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना वाचावी.

कसं कराल अर्ज?
– सर्वात आधी उमेदवारांनी ncert.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
-त्यानंतर NCERT रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
– यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करा.
– फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
– त्यानंतर फी भरा आणि अंतिम सबमिट बटणावर क्लिक करा.
– उमेदवारांनी फॉर्म डाउनलोड करा