सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; थेट मुलाखतीद्वारे केली जाणार भरती

तरुण भारत लाईव्ह । ३ एप्रिल २०२३। ICRTC मध्ये तब्बल विविध पदांसाठी भरती निघाली आहे. आणि यामध्ये कोणतीही परीक्षा नाही थेट मुलाखतीद्वारे थेट भारतीय रेल्वेत नोकरी करण्यासाठी सुवर्णसंधी आली आहे. यासाठी तुम्ही अर्ज करू शकता, यासंबंधीतील अर्जाची शेवटची तारीख, पात्रता, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

३ एप्रिल पासून IRCTC मध्ये मुलाखत ही होणार आहे. भारतीय अर्थातच ICRTC द्वारे जाहीर केलेला टुरिझम मॉनिटर आणि हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्सच्या पदांच्या अर्थातच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार कॉर्पोरेशन अधिकृत च्या वेबसाईटवर भरतीची अधिसूचना अर्थत जाहिरात डाउनलोड देखील करू शकता. आणि अधिसूचनेत दिलेल्या फॉर्म पूर्णपणे पाहून आवश्यक कागदपत्रे जोडून उमेदवारांना थेट मुलाखातीसाठी हजर राहावे लागले. मुलाखतीची तारीख आणि ठिकाण नुसार बदलते. जे उमेदवार संबंधित भरतीत अधिसूचनेमध्ये तपासू शकतात.

थेट मुलाखतीद्वारे ही भरती केली जाणार आहे,  भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड भारत सरकारच्या रेल्वेत मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने विविध झोनमध्ये पर्यटन मॉनिटर, आणि हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्सच्या पदांसाठी भरतीसाठी स्वतंत्र भरती सूचना जारी केली आहेत. महामंडळाने :- पूर्व विभाग, पश्चिम विभाग, दक्षिण विभाग, आणि दक्षिण मध्य विभागासाठी जारी केलेल्या भरती अधिसूचनानुसार दोन्ही पदांसाठी एकूण 176 पदांसाठी भरती केली जाणार आहे. वेगवेगळ्या तारखांना मुलाखती ह्या आयोजित केले जाणार.