नवी दिल्ली : देशातील लाखो पेन्शनधारकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने कर्मचारी पेन्शन योजना, १९९५ च्या पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. यानंतर, आता कर्मचारी पेन्शन योजनेत सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत योगदान देऊनही EPS सदस्य पैसे काढू शकतील. या निर्णयाचा फायदा सुमारे ७ लाख ईपीएस सदस्यांना होईल.
पीआयबीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार केंद्र सरकारने तक्ता डी देखील सुधारित केला असून आतापासून पैसे काढण्याचा लाभ सदस्याने किती महिने सेवा दिली आणि पगारावर योगदान दिलेल्या ईपीएसच्या रकमेवर अवलंबून असेल. यामुळे सदस्यांचे पैसे काढण्याचे फायदे तर्कसंगत करण्यास मदत होईल.
आत्तापर्यंत पैसे काढण्याचा लाभ सेवेत पूर्ण झालेली वर्षे आणि ईपीएसमध्ये योगदान दिलेल्या पगाराच्या आधारावर मोजले जायचे. तसेच सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ योगदान दिले आहे तेच सदस्य पैसे काढण्याचा लाभ घेऊ शकत होते. अशा परिस्थितीत सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी योगदान देऊन योजनेतून बाहेर पडणाऱ्यांना पैसे काढण्याचा कोणताही लाभ मिळत नव्हता.