तरुण भारत लाईव्ह ।१३ मार्च २०२३। एका बाजूला सोयाबीन, सूर्यफुलाचे भरगोस उत्पादन बाजारात येत असल्याने खाद्य तेलाचे बाजारात भाव कमी झाले आहेत. तेलासह तुपाच्या दरात सरासरी दहा टक्क्यांनी घट झाली आहे. सोयाबीन 120 रुपये तर सूर्यफूल 130 रुपये प्रति किलो तेल विकल जात आहे.
कोरोनाच्या लाटे पासूनच तेलाचे भाव महागले होते. सर्वसामान्य जनतेच्या आवाक्या बाहेर तेलाच्या किमती जात होत्या. मात्र दिवाळीनंतर तेलाच्या किमती कमी झाली आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यात तेल दहा ते पंधरा टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. अमेरिका युरोप आणि खास करून चीनमध्ये कोविड परिस्थिती नियंत्रित झाल्यानंतर तेलाच्या बाजारात तेजी आल्याचे पाहायला मिळाले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तेलाची मागणी वाढली. मात्र तेवढा पुरवठा होऊ शकला नाही. पर्याय संपूर्ण जगात तेलाचे भाव वाढले होते. मात्र आता तेलाचे भाव कमी झाले आहेत.
असे आहेत तेलाचे भाव
सोयाबीन – १२०-१३०
शेंगदाणे – १८०-२००
सूर्यफूल – १३०-१४५
पाम तेल – १२०-१३०