सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; महागाई भत्ता वाढवला

नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आता महागाई भत्ता वाढवल्याचे जाहीर केले. बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांची किरकोळ वाढ करण्यात आली आहे.

ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीसाठी बँकर्ससाठी महागाई भत्ता जारी करण्यात आला आहे. हे एप्रिल २०२३ ते जून २०२३ या कालावधीतील CPI क्रमांकांच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आले आहे. आधारभूत वर्ष २०१६ सह CPI डेटाच्या आधारावर निर्णय घेण्यात आला.

बँक कर्मचाऱ्यांना सध्याच्या ५९६ डीए स्लॅबच्या तुलनेत ६३२ डीए स्लॅब दिला जाईल. म्हणजे एकूण ३६ डीए स्लॅबचा बूम त्यात आला आहे. दरम्यान, ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत बँक कर्मचाऱ्यांचा दर ४४.२४ टक्के झाला आहे. मे ते जुलै २०२३ पर्यंत ४१.७२ टक्के डीए दिला जात होता. एकूण २.५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.