Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! ‘या’ महिन्यांचा रखडलेला हप्ता लवकरच खात्यात जमा होणार ?

---Advertisement---

 

खुशखबर…! राज्यातील कमी उत्पन्न असलेल्या गटातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हप्ते अनियमित झाल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचे वातावरण होते. विशेषतः जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने अनेक महिला प्रतीक्षेत होत्या.

या योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये थेट जमा केले जातात. मात्र निवडणूक आचारसंहिता आणि काही प्रशासकीय कारणांमुळे निधी वितरणात विलंब झाला होता.

प्रलंबित हप्त्यासाठी निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू:

मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्याच्या प्रलंबित हप्त्यासाठी निधी वर्गीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या खात्यातून सुमारे 98.25 कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारकडून निधी वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याने पुढील काही दिवसांत लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळू शकतो.

E-KYC बाबतही महत्वाचा निर्णय:

दरम्यान, अनेक महिलांनी E-KYC पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याच्या तक्रारी केल्या होत्या. काही प्रकरणांमध्ये तांत्रिक अडचणी किंवा माहिती अपूर्ण असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर सरकारने E-KYC अद्ययावत करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित महिलांनी आपली KYC माहिती तपासून आवश्यक दुरुस्ती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे निधी वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते. मात्र निवडणुका पूर्ण झाल्यानंतर प्रलंबित रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया पुन्हा गतीमान करण्यात आली आहे. लाडकी बहिण योजनेचा जानेवारी महिन्याचा प्रलंबित हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाल्याने लाभार्थी महिलांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---