तरुण भारत लाईव्ह । ३ सप्टेंबर २०२३। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात काळ मुसळधार पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीपासून पावसाने राज्यातील काही भागांमध्ये हजेरी लावली. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
दरम्यान राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा पावसाला सुरवात झाली मुंबई, नवी मुंबई, पुणे या जिल्ह्यात शनिवारी जोरदार पाऊस झाला पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांसह पाऊस हजेरी लावेल. तर, मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही पावसाची संततधार दिसून येईल. तर राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ आणि मराठवाड्यात चार सप्टेंबर नंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोवा या भागात रविवारी येलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत असून या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मंगळवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहेत. यामुळे पुढील पाच ते सात दिवस पुणे परिसरात पाऊस कायम असण्याची शक्यता आहे.