तरुण भारत लाईव्ह । ७ ऑक्टोबर २०२३। गुगल कपंनीने Pixel 8 आणि Pixel 8 Pro हे बुधवारी लाँच केले. ह्या स्मार्टफोन मध्ये नवीन Android 14 ऑपरेटिंग सिस्टिम मिळते. या दोन्ही फोनचे फीचर्स काय आहेत आणि या दोन्ही स्मार्टफोनची किंमत काय आहे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
Pixel 8 आणि Pixel 8 Pro दोन्ही ड्युअल-सिम स्मार्टफोन आहेत, ज्यात Android 14 आउट-ऑफ-द-बॉक्स मिळतो. Pixel 8 मध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.२-इंचाचा FHD+ (१,०८०x२,४०० पिक्सल) OLED डिस्प्ले मिळतो, जो २१०० nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो, तर Pixel 8 Pro मध्ये १२० हर्ट्झ ६.७-इंचाचा QHD+ (१,३४४x२,९९२ पिक्सल) LTPO OLED डिस्प्ले मिळतो, जो २४०० nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
Pixel 8 Pro च्या मागे तीन कॅमेरे आहेत, ज्यात OIS सह एक ५० मेगापिक्सलचा फेज-डिटेक्ट ऑटोफोकस वाइड शूटर, एक नवीन ४८ मेगापिक्सलचा क्वॉड-PD अल्ट्रावाइड, आणि तिसरा ३०X सुपर-रेज डिजिटल झूमसह ४८ मेगापिक्सलचा क्वॉड-PD ५एक्स झूम कॅमेरा. तसेच, स्टँडर्ड Pixel 8 मध्ये ड्युअल कॅमेरा आहे, ज्यात ८x सुपर-रेस डिजिटल झूम सह ५० मेगापिक्सलचा ऑक्टा-PD कॅमेरा आणि दुसरा ऑटोफोकस आणि मॅक्रो मोड असलेला १२ मेगापिक्सलचा सेंकडरी सेन्सर आहे. Pixel 8 आणि 8 Pro दोन्ही मध्ये ऑटोफोकस सपोर्टसह १०.५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
Pixel 8 च्या ८ जीबी रॅमसह १२८ जीबी स्टोरेज कॉन्फिगरेशन lची किंमत ७५,९९९ रुपये आहे. स्मार्टफोन हेजल, ओब्सीडियन आणि रोज कलर या रंगामध्ये उपलब्ध आहेत. Pixel 8 Pro च्या १२ जीबी+१२८ जीबी मॉडेलची किंमत १,०६,९९९ रुपये आहे. प्रो मॉडेल ओब्सीडियन आणि पोर्सिलेन कलर यामध्ये उपलब्ध आहेत.