TikTok App : भारतात खरोखरच पुनरागमन करणार का? सरकारने दिले स्पष्टीकरण

---Advertisement---

 

TikTok App : टिकटॉक अॅप अद्याप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध नसले तरी भारतातील लोक आता टिकटॉकची वेबसाइट अॅक्सेस करू शकतात, असा दावा एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्याने केला आहे. मात्र, भारत सरकाने हा दावा फेटाळून लावला आहे.

दूरसंचार विभागाने (DoT) म्हटले आहे की भारतातील सर्व इंटरनेट सेवा प्रदात्यांकडून टिकटॉकची साइट अजूनही ब्लॉक आहे. त्यामुळे या वापरकर्त्याच्या दाव्याबाबत X आणि Reddit सारख्या प्लॅटफॉर्मवर मीम्सचा पूर आला आहे.

वृत्तानुसार, दूरसंचार विभागाने म्हटले आहे की देशातील कोणत्याही इंटरनेट सेवा प्रदात्याकडून टिकटॉकची वेबसाइट उपलब्ध नाही. दरम्यान, टिकटॉकची मूळ कंपनी बाईटडान्सने भारतात या प्लॅटफॉर्मच्या उपलब्धतेबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---